Previous
Next

🚩महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले।मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले।खरा वीर-वैरी पराधिनतेचा।महाराष्ट्र आधार या भारताचा🚩

🚩महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले । मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले ।
खरा वीर-वैरी पराधिनतेचा । महाराष्ट्र आधार भू भारताचा ।🚩

           ‘सशक्त भारत’ निर्माणाचेच स्वप्न पाहून समाजहित रक्षणार्थ काम करणार्‍या, देशभर कार्यरत १३ संस्था आणि महाराष्ट्रातील ६३ विभिन्न संस्थांच्या संगठित समन्वित प्रयत्नांचे फळ म्हणजे वर्तमाणातील ही विविध अभियाने आणि नित्य उपक्रम होत. ना कोणती संस्था, ना कोणतीही संघटना, ना कोणती विशेष विचारधारा, ना कोणतीही बाध्यता. केवळ आणि केवळ ‘राष्ट्रहित सर्वोपरि’ मानून, अनेकानेक समन्वयसूत्रांचे  प्रकटीकरण एवढेच काय ते दृश्यमान स्वरूप धारण केलेले, हे सारे कार्य राष्ट्रवेदीवर अर्पण करण्यास तत्पर युवक – युवती आत्यंतिक समर्पित भावाने करत आले आहेत. कोणताही एखादा निश्चित रंग, रूप, गंध, आकार, वैचारिक बैठक, मत-पंथ-संप्रदाय विशेषता नाकारून राष्ट्रहितपूरक प्रत्येक लहान – मोठी कार्ये आपली मानून काम करण्याचा स्वभाव या सार्‍या राष्ट्रभक्तांनी बनवला आहे.

           मनुष्य ‘देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि आपण त्याचे देणे लागतो’ हा सूत्रविचार मनात स्थापित करून स्थानीय स्थितीप्रमाणे आवश्यकतेनुसार राष्ट्रकल्याणास पूरक कार्यांना आजपर्यंत आम्ही करत आलो आहोत.  ईशान्य भारतातील चहाच्या मळ्यात काम करणार्‍या सदानी बांधवांच्या मुलांसाठीच्या रात्रशाळेचे काम  ‘भास्कर ज्ञानपीठ’ या नावाने ओळखले जाते.  जम्मू-काश्मीर मधील पूंछ, राजौरी, पुलवामा, बारामुला सेक्टर मधील स्थानीय मुलांसाठी ‘असीम फौंडेशन’ या नावाने अठरा संगणक प्रशिक्षण केन्द्रे चालू आहेत. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीच्या मार्गदर्शनात ‘ज्ञानसेतु’ अर्थात्  ‘Knowledge Bridge’ च्या माध्यमातून जम्मू-काश्मीर, झारखंड, छत्तीसगढ तसेच ईशान्य भारतातील सातही राज्यांमध्ये स्थानीय रचनांच्या माध्यमातून संचालित विविध विद्यालयांमध्यें पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्हा केन्द्रातील महाविद्यालयीन युवक – युवती स्वखर्चाने जाऊन  विज्ञान, गणित व इंग्रजी शिकवतात.

स्वर्गश्रेष्ठ जन्मभूमी (भारतभूमी) वंदन, परमश्रद्धेय लोकोत्तर महापुरूष संस्मरण, विविध मातृभूमी दर्शन अभियाने

२००० : भागवतधर्माचे आद्य प्रचारक संतशिरोमणी श्रीनामदेव महाराजांच्या षष्ठ शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समाधीवर्ष निमित्ताने पंजाब मधील, गुरूदासपुर जिल्ह्यातील घुमानमध्ये भागवतधर्मातील निष्ठावान पाईक असलेल्या ५८३२ वारकर्‍यांचे श्री  नामदेव गाथा पारायण. 

२००० : शीख परंपरेचे दहावे पातशाह श्रीगुरू गोबिन्दसिंहांनी हिंदू धर्म रक्षणार्थ आवश्यक योद्धा निर्मितीसाठी केलेल्या खालसा पंथ संस्थापनेच्या ३०० व्या वर्षपूर्ती निमित्त तख्त श्री केसोगढसाहिबजी, आनंदपुरसाहिब, पंजाबमध्ये वारकरी-शीख समन्वय दिंडीचे आयोजन.

२००१ : अहिंसा विचारसूत्राचे सर्वाधिकारी, २४ वे आणि अंतिम तीर्थंकर भगवान श्रीवर्धमान महावीरांच्या जन्माच्या २६०० व्या प्राकट्य वर्ष पूर्ती निमित्त जयपूर, राजस्थानात ‘शाकाहारव्रति सम्मेलना’च्या माध्यमातून सृजनात्मक भव्यतेचे  वैभवशाली आयोजन. 

२००५ : भारतोद्भव विभिन्न धर्म-मत-पंथ-सम्प्रदाय (जसे वैदिक, जैन, बौद्ध, शीख, शैव, वैष्णव, आर्य, शाक्त, रविदासी, वाल्मीकी, कबीरपंथी, महानुभाव, सनातनी, कृष्णप्रेमी) इ.प्रबुद्ध व अनुभवसिद्ध लोकांचे ‘भक्तिधारा संगम’ नावाने एकतासूत्र मिलन प्रारंभ.

२००६ : धर्म संस्कृति संगमाच्या नेतृत्वात विविध संस्थांच्या समन्वित प्रयत्नांनी आशियातील हिन्दू, बौद्ध, ताओ, शिंतो, कन्फ्युशिअस या  ५ संस्कृत्यांच्या, १८ देशांतील ४५३ विद्वानांचे आणि धर्मनिष्ठ बांधवांचे समन्वयनगरी वाराणसी, उत्तर प्रदेशमध्ये एकत्रीकरण.

२००७ : तथागत भगवान गौतम बुद्धांचे २५५१ वे जन्मवर्ष व भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांनी प्रवर्तन केलेल्या द्वितीय धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ५० व्या प्रेरणावर्षानिमित्ताने १३ देशांतील धम्मप्रेमींचे सारनाथ, काशी येथे आयोजित केलेले  ‘बौद्ध महासम्मेलन’. 

 २००८ : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज जन्मचतु:शताब्दी, राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी जन्मचतु:शताब्दी, श्रीगुरूग्रंथसाहिब स्थापना (गुरूतागद्दी) त्रिशताब्दी, ग्रामगीताकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी निमित्ताने २०० वारकरी, १५० शीख आणि ३८ समर्थ भक्तांच्या ‘लोकजागृती यात्रा’ माध्यमातून संतांच्या पादुका आणि श्रीगुरूग्रंथसाहिबांच्या पालखीसहित महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यातील यात्रा. 

२०१२ : पानिपताच्या तिसर्‍या लढईच्या २५१ व्या स्मृतीवर्षात ५५३ युवक-युवतींचा पुणे-पानिपत-वाघा सीमा, अमृतसर-पुणे मार्गावर ५७६४ किमींचा ८ राज्ये व ७६ जिल्ह्यातील प्रवास, मोहीम समारोपास तत्कालीन राष्ट्राध्यक्षा  श्रीमती प्रतिभाताई पाटीलांचे प्रेरक संबोधन  

२०१३ : भारत-चीन लढाईच्या ५१ व्या वर्षपूर्ती  जागरणा निमित्ताने ईशान्येकडील ८ राज्यांतील ४५ जिल्ह्यात  ५९८२ किमींचा पूर्वांचल दुचाकी अभिवादन प्रवास. संबंधित राज्यांच्या राज्यपालांशी थेट भेटी करून पूर्वांचलातील विविध प्रश्नांवर फलदायी निष्कर्षाभिमुख चर्चा . 

२०१३ :भारतोद्भव विभिन्न धर्म-मत-पंथ-सम्प्रदायातील  पूज्य संतांचे ‘भारतीय संत सभे’ च्या मार्गदर्शनात  पुण्यात प्रशिक्षण शिबिराची योजना. 

२०१४ : ज्वलज्ज्वलनतेजस धर्मवीर श्रीशंभुछत्रपतींच्या ३२५ व्या हौतात्म्य (बलिदान) स्मृतीवर्षा निमित्ताने जन्मभूमि श्रीपुरंदर ते श्रीक्षेत्र वढू मार्गे  संगमेश्वर-श्रीधर्मवीरगड-तुळापुर पर्यंत  ‘धर्मवीर आत्मजागर मोहिमे’ च्या निमित्ताने प्रतिवर्ष कृतज्ञता जागरण अभियानाचे आयोजन. 

२०१५ : ऊर्जावान, उपक्रमशील युवक (धारकरी) व अनुभवी, श्रदधाळु ज्येष्ठ (वारकरी) यांच्यातील समन्वयासाठी शक्तिपंढरी दुर्गदुर्गेश्वर  श्रीरायगड ते भक्तिपंढरी भूवैकुंठ श्रीपंढरपुर पर्यंतच्या युगप्रवर्तक छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पादुकांच्या पायी वारीचा अधिकृत प्रारंभ सन १९९५ मध्ये प्रायोगिक स्तरावर प्रारंभित सोहळा कोरोना काळातही पायीच गेल्याने आषाढी वारीत पायी चालण्याची परंपरा जपणारा एकमेव अखंडित सोहळा ठरला.

२०१६ : विशाल सिंधुसागराच्या संकटाला तोंड देण्यासाठी उभारलेल्या पूर्णतः स्वदेशी आरमाराचे निर्माते, भारतीय आधुनिक नौदलाचे पितामह श्रीशिवाजी महाराजांच्या पहिल्या सागरी स्वारीच्या ३५० व्या प्रेरणावर्षानिमित्ताने ३ राज्यांमधील ५९ जलदुर्गांचा अध्ययन दौरा. 

२०१७ : पूर्णतः  समाजहितसमर्पित द्रष्टया जीवनचरित्रातून राष्ट्र नवनिर्माण  करणार्‍या युगप्रवर्तक, शकनिर्मात्या छत्रपती श्रीशिवाजी महाराजांची प्रेरणादायी चरित्रगाथा गीत, संगीत, लघुनाटिका मंचन व नवरसयुक्त विवेचनातून सांगण्याची परंपरा ‘श्रीशिवभारत आख्यान’ प्रारंभ. 

२०१८ : हिंदवी स्वराज्याचा एकही पैसा खर्च न करता, रक्ताचा एकही थेंब न सांडवता औरंगजेबाची जागतिक स्तरावर पर छी:थू करवून सह्याद्रीच्या छत्रछायेत परतणार्‍या श्रीशिवाजी महाराजांना त्यांच्या प्रवासात सहकार्य  करणार्‍या वर्तमान भारतवर्षातील १४ राज्यांच्या ९१ जिल्ह्यांमधील २८७ तालुका केन्द्रातील उत्तर भारतीयांप्रती कृतज्ञता अभियान  : श्रीशिवछत्रपती राजकीय उत्तर दिग्विजय मोहीम. 

२०१९ : श्रीशिवछत्रपती महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या पूर्वाभ्यासनिमित्ताने अभियान पूर्वसंचालनातून जिल्हाश: जागरण प्रवास.    

२०२० :पोर्तुगिजांच्या ताब्यातील दक्षिण कन्नड तटीय क्षेत्र मुक्त करवून सिद्ध बसरुरु स्वातंत्र्यदिनाचा कर्नाटक प्रांतस्तरीय लोकोत्सव. 

२०२१ : दक्षिण भारत कृतज्ञता (कर्नाटक, आंध्र, तामिळनाडु) अभियान. 

२०२२ :  तिसर्‍या भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि पानीपत गौरवगाथेच्या २६१ व्या वर्षानिमित्ताने जागरण अभियान.

२०२३ : श्रीमंत दत्ताजीराव शिंद्यांच्या तेजस्वी हौतातम्याचे बुराडी घाट दिल्ली येथे २६१ वर्षांतर पहिल्यांदाच कृतज्ञता जागरण. 

             संत श्रीनामदेव महाराज ७५० वे जन्मवर्ष व संत श्रीज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी ७२५ वर्षनिमित्ताने घुमानमध्ये हिंदी ज्ञानेश्वरी पारायण  बांग्लादेश निर्मिती विजयोत्सव, पूर्वांचल जागरण

२०२४ : हिंदुस्थानाचा पहिला स्वातंत्र्यदिन अर्थात् श्रीमन्नृप शिवछत्रपतींच्या राजाभिषेकाचा दुर्गराज रायगडी ३५० वा वर्धापनदिन महोत्सव. 

२०२५ :उत्तर दिग्विजय अभियान संचालन                               

२०२६ : श्रीरायगड ते लंडन अर्थात् पश्चिम विश्वसंचार

२०२७ : श्रीरायगड ते इंडोनेशिया : आग्नेय आशिया विश्वसंचार        २०२८ : दक्षिण दिग्विजय अभियान संचालन. 

२०२९ : अटकविजय-सिंधुदर्शन / लेह-लडाख-खारदुंगला-कारगील  २०३० : श्रीशिवप्रभु देहोत्सग- ३५० वे अनुगामित्व सिद्धता वर्ष.

२०३० : हिंदवी स्वराज संस्थापक, युगप्रवर्तक, शककर्ते श्रीमंत छत्रपती श्रीशिवाजी महाराज जन्मचतु:शताब्दी राष्ट्रीय प्रेरणा महोत्सव.

मोहिमांचा यशस्वी भूतकाळ

पानिपत मोहीम

पानिपतावर झालेल्या तिसऱ्या रणसंग्रामाच्या २५१ व्या गौरववर्षा निमित्ताने पुणे-पानिपत-वाघा सीमा- अयोध्या-काशी मार्गे परत पुणे असा एकूण ५७६४ किमी चा ८ राज्ये ७६ जिल्ह्याचा प्रवास. पानिपतावर पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी तत्कालीन राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीत शौर्यसभा घेण्यात आली.
अधिक माहिती

पूर्वांचल मोहीम

१९७१ च्या भारत-चीन युद्धाच्या ५१ व्या वर्षपूर्ती निमित्त पूर्वांचलातील स्थानिकांना धन्यवाद देण्यासाठी दुचाकी अभिवादन मोहीम. ८ राज्ये ४५ जिल्ह्यातून एकूण ५९८२ किमी यात्रेत पूर्वांचलात कृतज्ञता जागरण करतांना सभा घेऊन स्थानिक स्तरावर असलेल्या वेगवेगळ्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.
अधिक माहिती

आत्मजागर मोहीम

श्रीशंभुछत्रपतींच्या ३२५ व्या हौतात्म्य स्मृतिवर्षाचे जागरण म्हणून आत्मजागर मोहिमेचे आयोजन केले गेले होते. श्रीशंभुछत्रपतींची जन्मभूमी श्रीपुरंदर ते संगमेश्वर ते धर्मवीरगड (बहादूरगड) - तुळापुर - वढू बुद्रुक पर्यन्त ही मोहीम प्रत्येक वर्षी होत असते.
अधिक माहिती

श्रीमन्नृपशिवछत्रपती पालखी सोहळा

अनुभवी, श्रद्धाळू वारकरी व सळसळत्या-उसळत्या रक्ताच्या तरुणाईमध्ये भक्ति-शक्ति समन्वयाच्या हेतूने आयोजित शक्तिपंढरी दुर्गदुर्गेश्वर श्रीरायगड ते भक्तिपंढरी श्रीपंढरपुरीची युगप्रवर्तक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची चरण पादुका वारी प्रारंभ. कोरोना निर्बंधातही एसटी नाकारून आषाढी वारीत पायी चालण्याची परंपरा अखंडीतपणे जपलेला हा जगातील एकमेव पालखी सोहळा ठरला आहे.
अधिक माहिती

आरमार मोहीम

श्रीशिवछत्रपतींच्या पहिल्या व एकमेव सागरी संचाराचे ३५० वे प्रेरणावर्ष सिंधुसागरातून शिडाच्या होडीने तसेच दुचाकी वाहनांनीही महाराष्ट्र-गुजरात सीमा ते कर्नाटक-केरळ सीमावर्ति भागात अभिवादन यात्रेने पार पडले. या मोहिमेच्या निमित्ताने पुणे-मुंबई-गोवा-कारवार-बसरूरू असा ३ राज्ये आणि १५ जिल्ह्यातून एकुणात ५९ जलदुर्गांचा अभ्यास दौरा पार पडला.
अधिक माहिती

श्रीशिवभारत आख्यान

श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे आचार, विचार आणि संस्कार आजच्या काळात भावी तरुण पिढीवर रुजविण्यासाठी व शिवाजी महाराजांच्या कार्यापासून सार्थ बोध घेवून कृतिरुप शिवजागर करण्यासाठी श्रीक्षेत्र गोरक्षगड पायथा, मु. कातरणी, ता. येवला येथे परिसरातील सर्व शिवभक्तांच्या सहकार्याने होत असलेला हा एक आगळा वेगळा वैचारिक मंथन सोहळा भविष्याच्या इतिहासात आपला ठसा उमटवेल असा झाला.
अधिक माहिती

गरुड भरारी मोहीम

हिंदवी स्वराज्याचा एकही पैसा खर्च न करता, रक्ताचा एकही थेंब न सांडवता औरंगजेबाची जागतिक स्तरावर पर छी:थू करवून सह्याद्रीच्या छत्रछायेत परतणार्‍या श्रीशिवाजी महाराजांना त्यांच्या प्रवासात सहकार्य करणार्‍या वर्तमान भारतवर्षातील १४ राज्यांच्या ९१ जिल्ह्यांमधील २८७ तालुका केन्द्रातील उत्तर भारतीयांप्रती कृतज्ञता अभियान : श्रीशिवछत्रपती राजकीय उत्तर दिग्विजय मोहीम.
अधिक माहिती

वर्तमानातील मोहीम

मोहिमेच्या अधिक माहितीसाठी

सुधीरभाऊ इंगवले

+९१ ९६२३१ ३८९९९

संकेतदादा गुरव

+९१ ८४४६० ०७७९७

अमितभाऊ बडदे

+९१ ९६२३४ ५७७३६

विजयदादा खैरे

+९१ ७७०९४ ०३७९४

कार्यालयाचा पत्ता

श्री. ज्ञानेश्वर जेधे-देशमुख / अधिवक्ता श्री. अजितराव शिंदे जेधे-शिंदे असोसिएटस्, शंकर सहकारी सोसायटी सर्व्हे नं. ३२, महाराणा प्रताप चौक, त्रिमूर्ती चौकाजवळ आंबेगाव बुद्रुक, पुणे - ४११ ०४३

मोहिमेच्या अधिक माहितीसाठी आमची सामाजिक माध्यमे

Follow us @sashakta_bharat @sashakta_bharat @sashakta_bharat

Days
Hours
Minutes
Seconds